संगीत क्षेत्राची ‘ आशा ‘ मावळली

आशा भोसले यांचे निधन

0

आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले…नकळत डोळे भरून आले….मला आशाताईंबद्दल जाणवलेली गोष्ट म्हणजे,आशाताई फार कणखर आणि लढवय्या (परिस्थितीशी लढणाऱ्या)होत्या.त्यांना त्यांच्या जीवनात कितीही मोठे यश मिळाले असले तरी, त्यांना अनेक कटु प्रसंगांनाहीही सामोरे जावे लागले.वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या गणपतराव भोसले यांच्याशी पळून जाऊन प्रेमविवाह केला.याला कुटुंबाचा विरोध होता.यामुळे काही काळ याचा त्यांना सामना करावा लागला.त्यांना तीन अपत्ये झाली.मात्र आशाताईंना भोसले यांचा केवळ अकरा वर्ष सहवास लाभला.यानंतर वीस वर्षांनी आशाताईंनी आपल्या पेक्षा वयाने सहा वर्ष लहान असणाऱ्या संगीतकार आर डी बर्मन यांच्याशी विवाह केला.या विवाहास बर्मन यांच्या आईचा विरोध होता.१९९४ साली बर्मन  यांचे निधन झाले.जीवनातील या दोन धक्क्यातून सावरून त्यांनी आपले करिअर सुरू ठेवले. खचून न जाता त्यांनी गायन क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले.आपल्या मोठ्या भगिनी लता मंगेशकर यांच्याशी त्यांची कायम तुलना होत राहिली.मात्र आशाताईंनी आपल्या अष्टपैलू गायकीतून करडो संगीत रसिकांच्या हृदयावर राज्य केले.लाइट म्युझिकच्या त्या क्वीन होत्या. दिल चीज है क्या….ही गझल असो, ये मेरा दिल… हे डिस्को साँग असो वा इशारा इशारोमें दिल..हे प्रेमगीत असो….प्रत्येक प्रकारच्या गाण्याला आशाताईंनी पुरेपूर न्याय दिला. आशा ताईंनी विविध संगीतकारांबरोबर काम केले. मात्र ओ पी नय्यर यांचे आशाताईंना वेगळी ओळख निर्माण करून देण्यात मोठे योगदान आहे.आईये मेहेरबा…. कजरा मोहब्बत वाला… उडे जब जब जुल्फे तेरी… आओ हुजूर तुमको… दिवाना हुआ बादल…. मांग के साथ तुम्हारा… लेके पहला पहला प्यार…. जाईये आप कहा जायेंगे….अशी एकापेक्षा एक हिट गाणी या जोडीने देऊन संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले…..माझी को सिंगर स्मिता आगरकर (अवंतिका मंडलिक) आशाताईंची  गाणी छान म्हणते…आम्ही दोघांनी अनेक कार्यक्रमात आशाताई व किशोर दा अथवा रफीसाब यांची गाणी सादर केली आहेत…. आशाताईंच्या निधनाची बातमी ऐकून निश्चितच तिला धक्का बसलेला असणार… संपूर्ण संगीत विश्वालाच हा फार मोठा धक्का असून संगीत क्षेत्राची ही न भरून येणारी हानी आहे….. लता मंगेशकर,गीता दत्त,सुमन कल्याणपुरकर तसेच शमशाद बेगम अशा दिग्गज गायिकेंच्या काळातही आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटवलेल्या आशाताई जाता जाता म्हटल्या असाव्यात….

मेरी गायकी क्या चीज हैं आप मेरी जान लिजिए……बस मैं ही गायकी की क्वीन हुं ये मान लिजिए..
Leave A Reply

Your email address will not be published.