नगरपरिषद निवडणुकीतून प्रकाश धारीवाल यांची एक्झिट 

...आणि शिरूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला

0

शिरूरनामा  न्यूज नेटवर्क 

शिरूर:शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल यांनी ,मला या निवडणुकीत व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे सहभाग घेता येणार नाही.असा निर्णय घेतल्याने  शिरूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला.त्यांच्या या निर्णयामुळे पंधरा वर्षांनंतर त्यांची नगरपरिषद निवडणुकीतून एक्झिट झाली.त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या शहरातील चाहत्यांमध्ये कमालीची निराशा पसरल्याचे दिसून आले.

           जागतिक स्तरावर व्यवसायाचा विस्तार असणारे धारीवाल व्यवसायामुळे कायम व्यस्त असतात.त्यातूनही आपल्या गावासाठी ते नेहमीच वेळ काढतात.निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्या शिरूर आगमनाचे शिरूरकरांना वेध लागले होते. काल (७) संध्याकाळी त्यांचे शिरूरला आगमन झाल्यावर शिरूरकरांनी त्यांच्या आशीर्वाद या निवासस्थानी मोठी गर्दी केली.विकास आघाडीचे आजी,माजी नगरसेवक,नागरिक यावेळी उपस्थित होते.यावेळी त्यांनी व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे सहभाग घेता येणार नाही.असा बाँब टाकल्याने शिरूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला.यावेळी उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडून तुम्ही निवडणूक प्रक्रियेतून बाजूला जाऊ नका अशी विनंती केली.काही झालेतरी शिरूरच्या विकास,सुरक्षितता,निर्भय वातावरणसाठी तुम्हीच हवा असा आग्रह धरला.बराच वेळ धारीवाल यांनी आपल्या व्यस्ततेविषयी भूमिका मांडत यावेळी आघाडीचे नेतृत्व करण्याविषयी असमर्थता दर्शवली.शिरूरकर मात्र ऐकण्यास तयार नव्हते.अनेक तासांच्या चर्चेनंतरही धारीवाल यांनी होकार दर्शवला नाही.यावेळी उपस्थितांनी ” प्रकाश शेठ तुम आगे बढो हम तुम्हा रे साथ है ‘ या घोषणेने परिसर दणाणून सोडला.शिरूरकरांचे प्रेम पाहून धारीवाल स्तब्ध झाले.मात्र रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नाही.
दरम्यान आज पुन्हा धारीवाल निवासस्थानी समर्थकांनी त्यांची विनवणी करण्याचा प्रयत्न केला.अनेकांनी भावनिक आवाहन केले.मात्र आजही धारिवाल आपल्या निर्णयावर ठाम राहिले. माजी आमदार पोपटराव गावडे,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार,सचिव मनसुख लाल, गुगळे,सदस्य संतोष भंडारी,घोडगंगाचे माजी संचालक पांडुरंग अण्णा थोरात, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण,नामदेवराव घावटे,माजी सरपंच अरुण घावटे,विठ्ठल घावटे आदींसह आजी माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

शिरूरकरांसाठी कायम आहे…शिरूरचा सलोखा असो,इतर कोणत्याही सामाजिक बाबतीत मी शिरूकरांसोबत असल्याचे धारीवाल यांनी सांगितले.पंधरा वर्ष मला सर्व सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली.मात्र काही गोष्टींचा त्रासही झाला.अशी खंत त्यांनी व्यक्त केली व्यवसायाची व्यस्तता तर आहेच मात्र उमेदवार निवडीत मी कशाला कोणाचा रोष घेऊ.असा सवाल धारीवाल यांनी केला.सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधून,आघाडीसोबत राहण्याचा निर्णय कळवला.मात्र  शहर आघाडी निवडणूक लढणार नसल्याचे आपण त्यांना कळवल्याचे धारीवाल यांनी सांगितले.

याविषयीचे वार्तापत्र उद्या….
Leave A Reply

Your email address will not be published.