धारीवाल कुटुंबियांनी केली झोपडपट्टीवासियांची दिवाळी गोड

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर: दीपावलीनिमित्त शहरात सर्वत्र आनंदाचे दीप प्रज्वलित होत असताना असे आनंदाचे दीप झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या बांधवांच्या घरातही प्रज्वलित झाले पाहिजेत या हेतूने आज प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल व आदित्य प्रकाशशेठ धारीवाल या पिता पुत्राने शहरातील झोपडपट्टी परिसरात प्रत्येकाच्या दारात जाऊन मिठाईचे वाटप केले.
           ५० हून अधिक वर्षांपासून धारीवाल कुटुंबीय आपल्या कर्मभूमीतील झोपडपट्टीवासियांची दीपावली गोड करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माणिकचंदजी धारीवाल यांनीही परंपरा सुरू केली. आपल्या वडिलांनंतर प्रसिद्ध उद्योगपती,शिरूर नगरीचे माजी नगराध्यक्ष रसिकलालजी धारीवाल यांनी ही परंपरा अखंडित पुढे सुरू ठेवली. ही परंपरा अबाधित राखण्याचे सत्कर्म प्रकाशभाऊ व आदित्य हे पिता पुत्र करताना दिसत आहे.धारीवाल कुटुंबीयांचा व्यवसायाचा विस्तार जगात अनेक देशांमध्ये आहे. देशातील नामांकित उद्योगपती मध्ये त्यांचा समावेश होतो.संपत्तीचीच नव्हे तर, दातृत्वामध्ये देखील धारिवाल कुटुंबाची सर्वदूर कीर्ती आहे. व्यवसायाची कितीही व्यस्तता असली तरीही आपल्या गावाप्रति असलेले  त्यांचे प्रेम हे किंचितही कमी झालेले नाही.शहराच्या विकासाचा प्रश्न असो अथवा वंचितांना मदत करण्याचा विषय असो,ते सदैव तत्पर असतात.आज दरवर्षी प्रमाणे प्रकाशभाऊ व आदित्य या दोघांनी शहरातील झोपडपट्टीमध्ये प्रत्येकाच्या दारात जाऊन मिठाई वाटप केले.शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,सचिव मनसुखलाल गुगळे,माजी नगराध्यक्ष रवी ढोबळे,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण,राष्ट्रवादी (अजित पवार) शहराध्यक्ष शरद कालेवार, राष्ट्रवादी (शरद पवार ) शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे,सचिन धाडीवाल,संजय देशमुख,पै अशोक पवार,प्रवीण दसगुडे,निलेश लटांबळे,आबीद शेख,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, तुकाराम खोले, अविनाश मल्लाव,प्रशांत शिंदे,जयवंत साळुंके, किरण बनकर,निलेश पवार,रंजन झांबरे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष एजाज बागवान,शिवसेना शहरप्रमुख मयूर थोरात,आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव,सुशांत कुटे,कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार,उद्योजक राजेंद्र लोळगे,विनोद धाडीवाल,सागर नरवडे,आशिष शिंदे,किरण पठारे,सुनील बोरा,मयूर नहार,हाफिज बागवान, आदी धारीवाल कुटुंबीयांचे स्नेही यावेळी उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.