• Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers
  • Friday, May 23, 2025

Shirur Nama Shirur Nama - Newsportal

Shirur Nama
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शासन व रुग्णालये यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शिरूरमधिल रुग्णांची हेळसांड

शासन व रुग्णालये यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शिरूरमधिल रुग्णांची हेळसांड

शासनाच्या योजनेअभावी खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भरावे लागणार बिल

ताज्या बातम्याराज्य
By Shirur Nama On Jul 26, 2020
0
Share
शिरूरनामा न्यूजनेटवर्क
प्रविण गायकवाड

शिरूर: शासन, प्रशासन व शहरातील खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांची हेळसांड होतानाचे चित्र आहे. यामुळे स्थानिक प्रशासनही हवालदिल झाले असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
        शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाच्या खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याच्या आदेशाप्रमाणे शहरात मातोश्री मदनबाई माणिकचंद धारीवाल, वेदांता,विघ्नहर्ता व श्रीगणेशा या रुग्णालयांमध्ये समर्पित कोविड आरोग्य सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.सर्वात प्रथम येथील धारीवाल रुग्णालयात सतरा जुलैपासून कोविड सेंटर सुरू करण्यात आले.यानंतर इतर तीन रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.सुरुवातीला
खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बिल जिल्हा परिषद देणार असे रुग्णालय प्रशासनाला तोंडी सांगण्यात आले. याबाबत कसलेही लेखी पत्र त्यांना देण्यात आले नाही.तरीही सतरा जुलैपासून शहरातील कोविड सेंटरमध्ये रूग्ण दाखल करण्यास सुरुवात झाली.शासन बिल अदा करणार याबाबत स्पष्टता नसल्याने  रुग्णालयाचे प्रशासन संभ्रमित होते.रुग्णालय प्रशासनाने सांगीतल्यानुसार,अनेक रूग्णांचे त्यांना बिल मिळाले नाही.नऊ दिवसानंतर अचानक काल ( २५जुलै ) एका रुग्णालयाच्या प्रशासनाला रुग्णांकडूनच बिल घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.यानुसार आता रुग्णांना उपचाराचे बिल द्यावे लागणार आहे.प्रशासनाच्या या सुचनेमुळे आर्थिक दूर्बल रुग्णांची मात्र आता परवड होणार आहे.रुग्णाची आर्थिक परिस्थीती चांगली नसेल तर त्या रूग्णाला उपचार मिळणे कठीण होऊन बसले आहे.अशा रुग्णांचा शासनाला गांभीर्याने विचार करावा लागेल.
           शासनाने आर्थिक दूर्बल घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत रुग्णाला मोफत उपचाराची सुविधा मिळते. शहरातील एकाच रुग्णालयात ही योजना लागू आहे.या योजनेसाठी रुग्णालयांनी शासनाकडे अर्ज करावा लागतो.दूर्देवाने बहुतांशी रुग्णालयांनी यासाठी अर्जच न केल्याने सद्याच्या परिस्थीतीत गरजूंना मोफत उपचाराचा लाभ घेता येत नाही.जिल्हा परिषदेच्या योजनेचाही रुग्णांना लाभ मिळणार नाही.यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे.आजची परिस्थीती पाहता धारीवाल रूग्णालयात कोवीडचे आठ तर वेदांतामध्ये दहा रुग्ण दाखल आहेत.गेल्या दहा दिवसांत शहरातील एकाच कोविड सेंटरमध्ये तीन कोविड रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात दररोज एका तरी नविन रुग्णाची भर पडत आहे.अशात या रुग्णांना बेड मिळणे,आवश्यकता भासल्यास व्हेण्टिलेटरची सुविधा मिळणे गरजेचे आहे. शहरातील रुग्णालयांतील परिस्थीती पाहता एकूण दहाच व्हेण्टिलेटर्स आहेत.अशात व्हेण्टिलेटर्सची गरज भासणाऱ्या रूग्णांची संख्या वाढल्यास अवघड परिस्थीती निर्माण होऊ शकेल. शासनाने याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
शासनाने शहरात चार ठिकाणी कोवीड सेंटर्स सुरू केलीत.मात्र या सेंटर्सना पॅरामेडिकल स्टाफची समस्या सतावत असल्याचे सुत्रांनी सांगीतले.कोविड सेंटर्स सुरू केल्याने नर्सेस तसेच इतर स्टाफ पळून गेल्याचे चित्र आहे. याकडेही शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा यात रुग्णांचीच हेळसांड होणार आहे.
शासनाने कोविड व नॉनकोविड या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची काळजी घेतली पाहिजे असे म्हटले आहे. मात्र आयसीयू तसेच इतर वॉर्ड कोविडच्या रुग्णांनी व्यापलयावर ह्रदयविकार, किडनी अथवा गंभीर प्रकारचे आजार असणाऱ्या रूग्णांनी जायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील एका सेंटर्समध्ये कोविड व्यतिरिक्त दुसरा रुग्ण घेतला जात नाही. इतरही सेंटरने असे रुग्ण घेण्यास नाकारल्यास अशा रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागेल….. ‘याबाबत शासन काय भुमिका घेते हे पाहावे लागेल.
ReplyForward

0
Share FacebookTwitterReddItWhatsAppPinterestEmail
Shirur Nama

Prev Post

उन्नत भारत अभियानातंर्गत शिरूर तालुक्यातील पाच गावे दत्तक

Next Post

सौरउर्जा प्रकल्पामुळे रामलिंग ट्रस्टची दोन वर्षात चार लाख रुपयांची बचत

You might also like More from author
ताज्या बातम्या

संविधान प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनावा – राजवैभव

राज्य

स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

Uncategorized

माउली कटके ठरले जायंट किलर

ताज्या बातम्या

२४ नोव्हेंबर पासून शिरूर हवेलीत ‘ माऊली ‘पर्वाची सुरुवात ?

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Advertise Here 6
Advertise Here 5
Advertise Here 4
Advertise Here 3
Advertise Here 3
Advertise Here 2
Advertise Here 1
Square Ad banner
300×600 Ad Banner

बड़ी खबरें

Uncategorized

आमदार अशोक पवार यांचे काम न करण्याचा शिरूर तालुका काँग्रेसचा…

Uncategorized

अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांना…

मोठी बातमी

माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार…

मोठी बातमी

माऊली कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Prev Next 1 of 3
About Us

लोकप्रिय बातमी

कैलास गंगावणे यांच्यासह पत्नी व मुलीचा अपघातात करुण अंत

Jul 1, 2023

शिरूरमध्ये लॉकडाऊन नाही

Jul 11, 2020

अशोक पवार यांच्या ताब्यात कारखाना देऊन चूक केली –…

Dec 27, 2023
Prev Next 1 of 71

ट्रेंडिंग बातम्या

एम ई पी एल सारखे उद्योग गरजेचे — शरद पवार 

May 15, 2025

 शरद पवारांचा दौरा यशस्वी होणार का? 

May 14, 2025

आरोपीला फाशी द्या म्हणणाऱ्याचा मुलगाच निघाला आरोपी

Mar 18, 2025
Prev Next 1 of 92
© 2025 - Shirur Nama. All Rights Reserved.
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.