शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल यांनी ,मला या निवडणुकीत व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे सहभाग घेता येणार नाही.असा निर्णय घेतल्याने शिरूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला.त्यांच्या या निर्णयामुळे पंधरा वर्षांनंतर त्यांची नगरपरिषद निवडणुकीतून एक्झिट झाली.त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या शहरातील चाहत्यांमध्ये कमालीची निराशा पसरल्याचे दिसून आले.
शिरूरकरांसाठी कायम आहे…शिरूरचा सलोखा असो,इतर कोणत्याही सामाजिक बाबतीत मी शिरूकरांसोबत असल्याचे धारीवाल यांनी सांगितले.पंधरा वर्ष मला सर्व सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली.मात्र काही गोष्टींचा त्रासही झाला.अशी खंत त्यांनी व्यक्त केली व्यवसायाची व्यस्तता तर आहेच मात्र उमेदवार निवडीत मी कशाला कोणाचा रोष घेऊ.असा सवाल धारीवाल यांनी केला.सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधून,आघाडीसोबत राहण्याचा निर्णय कळवला.मात्र शहर आघाडी निवडणूक लढणार नसल्याचे आपण त्यांना कळवल्याचे धारीवाल यांनी सांगितले.