शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्याचे उध्वस्तावस्थेत असलेले प्रवेशद्वार नव्याने उभारण्याचा स्तुत्य उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान,शिरूर व शिवजन्मभूमी विभागाच्यावतीने राबविण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचा दुर्गार्पण सोहळा नुकताच पार पडला. सह्याद्री प्रतिष्ठानने गेल्या तीन वर्षात राज्यातील चौदा किल्ल्यांची उध्वस्तावस्थेत असलेली प्रवेशद्वारे लोकवर्गणीतून उभारली असून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.